रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
Trending
सीएसएमटीवरून थेट उरणला लवकरच लोकल वाहतूक!
खारकोपर ते उरणपर्यंतच्या लोकल मार्गाचे सीआरएस इन्फेक्शन सुरु
नवी मुंबई – मुंबईला थेट उरण शहराशी जोडणाऱ्या, नेरूळ ते उरण रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उभारणीचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे सध्या नेरूळ ते खारकोपर या टप्प्यात धावणारी नेरूळ-उरण रेल्वे काही दिवसांतच थेट उरणला पोहोचणार आहे. शनिवारपासून या मार्गावर सीआरएस इन्स्पेक्शन सुरू झाले आहे.
यानंतर हिरवा कंदील मिळाल्यावर उरणपर्यंत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर, सीएसटीहून रेल्वेने थेट उरणला जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या महिनाभरात नेरूळ-उरण रेल्वे सुरू होण्याचे संकेत रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.
२७ किमी लांबीच्या या रेल्वेमार्गाच्या उभारणीचे काम सिडको आणि रेल्वे यांच्या भागीदाराने केले जात आहे. यात सिडको आणि रेल्वेची भागीदारी अनुक्रमे ७७ टक्के व २३ टक्के आहे. नेरूळ-उरण रेल्वे मार्गावर एकूण दहा स्थानके असून या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च दोन हजार कोटींच्या घरात आहे.