रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग दिनी कोकण रेल्वेकडून जनजागृती मोहीम
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग जागृती दिनानिमित्त कोकण रेल्वेकडून विविध ठिकाणी क्रॉसिंगचा वापर करणाऱ्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
आंतरराष्ट्रीय लेवल क्रॉसिंग दिनानिमित्त सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, या पार्श्वभूमीवर रेल्वे क्रॉसिंगचा वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये जागृती मोहीम राबवली जाते.
कोकण रेल्वेने देखील या दिनाचे औचित्य साधून आपल्या मार्गावरील विविध ठिकाणी असलेल्या लेव्हल क्रॉसिंग गेटवर थांबलेल्या वाहनधारकांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने जागृती केली.