Konkan Railway | उद्याची हापा-मडगाव एक्सप्रेस जादा डब्यासह धावणार!
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेसला स्लीपर दर्जाचा एक अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना गर्दी वाढल्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. या गाडीला जादा डब्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांचा विशेष गाड्यांना सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आवश्यकतेनुसार रेल्वेकडून ज्यादा डब्यांची व्यवस्था करून यावर उपाययोजना केली जात आहे. रेल्वेकडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्ग धावणारी हापा- मडगाव (22908 ) या एक्सप्रेस गाडीला दि. 3 मे 2023 साठी स्लीपरचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. परतीच्या प्रवासात या गाडीला (22907) मडगाव येथून हापासाठी धावताना दि. ५ मे रोजी जादा डबा जोडण्यात येणार आहे