रेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल

Konkan Railway | मुंबई- मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १० जूनपासून सहा ऐवजी तीनच दिवस धावणार!

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस दिनांक 10 जून 2024 पासून आठवड्यातील सहा ऐवजी तीनच दिवस धावणार आहे. या प्रीमियम ट्रेन बरोबरच मुंबई मडगाव तेजस तसेच एलटीटी मडगाव या गाडीच्या फेऱ्या देखील कोकण रेल्वे मार्गावर अमलात येणाऱ्या पावसाळी वेळापत्रकामध्ये घटणार आहेत.

या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान धावणारी (22119/22120) ही गाडी 11 जून पासून आठवड्यातून पाच ऐवजी तीन दिवस धावणार आहे. याचबरोबर सध्या सहा दिवस धावणारी मुंबई सीएसएमटी ते मडगाव (22229/22230) ही गाडी 10 जून 2024 पासून आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
या गाडीशिवाय सध्या आठवड्यातून चार दिवस धावणारी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव (11099/11100) ही गाडी दिनांक 14 जून 2024 पासून कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक प्रमाणे आठवड्यातून दोनच दिवस जाणार आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button