Konkan Railway | संगमेश्वर- रत्नागिरी दरम्यान रेल्वेचा तीन तासांचा ‘मेगा ब्लॉक’
रत्नाागिरी : कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान मार्गाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणार्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. ८ ऑगस्ट रोजी संगमेश्वर ते रत्नागिरी असा (रत्नागिरी स्थानक वगळून) तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने तिरुनेलवेली- जामनगर (19577) या दि. ७ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु होणाार्या एक्स्प्रेसला ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.
याचबरोबर तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस (16346) ही ठोकूर ते रत्नागिरी स्थानका दरम्यान 1 तास थांबवून ठेवली जाणार आहे