कोकण रेल्वे मार्गावरील समस्यासंदर्भात खा. सुप्रिया सुळे, अजितदादा पवारांना निवेदन
कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
मुंबई : कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे या संघटनेतर्फे कोकण रेल्वे मार्गावरील प्रलंबित समस्या सोडवण्यासंदर्भात सोमवारी खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांना निवेदन देण्यात आली.
कोकण रेल्वे मार्गावरील समस्त संदर्भात कोकण विषय जास्त असलेल्या संस्था संघटनांनी हे प्रश्न सोडवणे संदर्भात मागील काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघातर्फे सोमवारी खासदार सुप्रिया सुळे तसेच विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांना निवेदने देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले. राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेतेद्वायिने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला आश्वस्त केले.
या शिष्टमंडळाने अजितदादा पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या लोकप्रिय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांची मुंबईत भेट घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील समस्या सोडविण्यासाठी विनंती केली. यावेळी संघटनेचे प्रमुख श्री. राजू कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष श्री. सुजित लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली, सचिव परेश गुरव, खजिनदार संभाजी ताम्हणकर, सल्लागार महेश आचरेकर उपस्थित होते.