तिरुअनंतपुरम -गांधीधाम एक्सप्रेस आजपासून विद्युत इंजिनसह धावणार
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गे धावणारी तिरुअनंतपुरम ते वेरावल ही साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक 23 जानेवारी पासून तिरुअनंतपुरम ते अहमदाबाद दरम्यान विद्युत शक्तीवर देव धावणार आहे.
कोकण रेल्वेमार्गे धावणारी एर्नाकुलम – ओखा एक्सप्रेस दिनांक 20 जानेवारीपासून विद्युत इंजिनवर धावू लागली आहे. याचबरोबर तिरुअनंतपुरम सेंट्रल ते वेरावल, नागरकोईल- गांधीधाम तसेच एर्नाकुलम ते निजामुद्दीन दरम्यान धावणारी नियमित एक्सप्रेस गाडी अशा चार एक्सप्रेस गाड्या आता विद्युत इंजिन सहज चालवल्या जाणार आहेत.
गाडीबरोबरच 16 334 /16 333 तिरुअनंतपुरम सेंट्रल – वेरावल ही गाडी तिरुअनंतपुरम सेंट्रलवरून 23 जानेवारीच्या फेरीपासून तर उलट दिशेच्या प्रवासात ही गाडी दि. 26 जानेवारी 2023 पासून अहमदाबादपर्यंत विद्युत इंजिनसह चालवली जाईल. नागरकोईल ते गांधीधाम दरम्यान धावणारी 16 336 /16 335 ही एक्सप्रेस गाडी विद्युत इंजिनसह चालवली जाणार आहे. नागरकोईल येथून ही गाडी 24 जानेवारीपासून तर अहदाबाद येथून ही गाडी 27 जानेवारीपासून विद्युत इंजिन जोडून चालवली जाईल.
कोकण रेल्वे मार्गे धावणारी चौथी एक्सप्रेस गाडी 22 655 22 656 एरणाकुलम ते हजरत निजामुद्दीन साप्ताहिक एक्सप्रेस एरनाकुलम येथून 25 जानेवारीपासून तर दिल्ली एरणाकुलम दरम्यान धावताना ही गाडी 27 जानेवारीपासून विजेवर चालवली जाणार आहे.