जगाच्या पाठीवरब्रेकिंग न्यूजरेल्वे अपडेट्स & ट्रॅव्हल
भारतातून श्रीलंकेत फेरीबोटीने अवघ्या ३ तासात पोहोचता येणार

भारत -श्रीलंका फेरीबोट सर्व्हिस मंगळवारपासून
चेन्नई : भारत श्रीलंका दरम्यान अत्यंत कमी तिकीट दरात प्रवास करण्याची संधी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फेरीबोट सर्विसमुळे उपलब्ध होणार आहे. बारा वर्षांपूर्वी हालचाली सुरू झालेल्या या प्रकल्पाला अखेर 10 ऑक्टोबर 2023 चा मुहूर्त मिळाला आहे. या फेरीबोट सेवेमुळे दोन्ही देशांमध्ये तीन तासांमध्ये प्रवास करणे शक्य होणार आहे.
तामिळनाडूतील नागापट्टीणम तसेच श्रीलंकेतील जाफीनामधील कणकेसंथुराई फेरी बोट सेवे संदर्भात दोन्ही देशांमध्ये झालेल्या MoU नुसार ही सेवा दिनांक 10 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मार्फत ही फेरीबोट चालवली जाणार आहे.