Uncategorizedमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजहेल्थ कॉर्नर
खेड शहरात पुराचे पाणी ओसरले; स्वच्छतेचे काम सुरू, व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली

खेड : खेड शहरातील कालच्या पावसामुळे निर्माण झालेली पाणी साचण्याची परिस्थिती आता पूर्णतः निवळली आहे. नगरपरिषदेच्या वतीने सकाळपासूनच शहरात स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा आणि रहदारीच्या ठिकाणी जमा झालेले चिखल आणि कचरा हटवण्याचे काम जोमाने सुरू असून, नागरिकांमध्येही दिलासादायक वातावरण आहे. परिस्थिती जवळपास पूर्वपदावर आली असून, व्यापाऱ्यांनी पुन्हा आपली दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे.नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना स्वच्छतेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, उर्वरित भागात देखील लवकरच काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.