महसूल पंधरवड्यानिमित्त लांजात विविध उपक्रम

लांजा : महसूल पंधरवड्याच्या निमित्त लांजा तहसील कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदार प्रमोद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पंधरवडयानिमित्त कार्यक्रम नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लांजा तालुक्यात एकूण 33 हजार 915 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 17 हजार 445 अर्ज पात्र ठरले आहेत.
वयोश्री योजनेखाली एकूण 644 अर्ज तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहेत तर मुख्यमंत्री तीर्थ क्षेत्र योजनेखाली अद्याप अर्ज प्राप्त झालेले नाहीत. १ ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत लांजा तहसील मार्फत विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व तलाठी मंडल अधिकारी यांना विविध योजनांचे मार्गदर्शन तहसीलदार प्रमोद कदम यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार सौ. उज्वला केळुस्कर आणि इतर महसूल अधिकारी उपस्थित होते.
लांजा तहसील कार्यालय आणि तलाठी मंडल कार्यालय स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. आज आज सोमवारी लांजा तालुका कृषी विभाग यांच्या वतीने कृषी कार्यक्रम घेण्यात आला. स्वच्छ सुंदर माझे कार्यालय कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, पीक पाहणी युवा संवाद महसूल जनसंवाद प्रणाली, सैनिक हो तुमच्यासाठी, व्यवस्थापन मार्गदर्शन ,अपंगांसाठी , दिव्यांगांसाठी मार्गदर्शन, युवा मार्गदर्शन महिलांसाठी विविध योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण महसूल पंधरवडा वार्तालाप, सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान आदी विविध कार्यक्रम लांजा तहसीलमार्फत राबवण्यात येणार आहेत.
कार्यक्रमानिमित्त आज शिपोशी येथे कृषि कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कृषी अधिकारी मोरे आणि कृषी सहाय्यक उपस्थित होते.