अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु

रत्नागिरी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी २५ जानेवारी २०२५ रोजी मुंबई गोवा हायवे प्रकल्पबाधित, धरणग्रस्त तसेच रेल्वे प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू झाले आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे श्री जाधव यांनी सांगितले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे बाधित झालेले प्रकल्पग्रस्त, खोकेधारक, धरण प्रकल्पग्रस्त तसेच रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी धरणे आंदोलन आहे.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे अशोकराव जाधव, संस्थापक अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्षही आहेत.
शनिवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे आंदोलन सुरू झाले आहे