महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

कीड नियंत्रणावरील कृषी कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : कृषीभूषण डाॅ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत मालघर गावात पिकांवरील कीडींच्या नियंत्रणासाठी कृषीदूतांद्वारे कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मोहिते सर यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांवरील कीड व रोग ओळखण्याच्या आणि त्यावर प्रभावी उपाययोजना राबवण्याच्या सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. यावेळी कांबळे सर व वडगावे सर उपस्थित होते.

कार्यशाळेत प्रोजेक्टरचा वापर करून विविध कीड व रोगांचे फोटो, लक्षणे, आणि उपाय समजावण्यात आले. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून विविध प्रकारच्या कीडींची ओळख पटवून दिली गेली. यामुळे शेतकऱ्यांच्या ज्ञानात लक्षणीय वाढ झाली.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचा सविस्तर ऊहापोह केला. कीड नियंत्रण, सेंद्रिय उपाय, नवीन औषधे, पिक संरचना यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना तज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. शेतकरी आणि मार्गदर्शक यांच्यातील सुसंवादाचा एक आदर्श येथे पाहायला मिळाला.

कार्यशाळेत महिला बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्य, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचा उपस्थिती आणि सहभाग लक्षवेधी ठरला. ग्रामीण कृषी विकासात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, हे या कार्यशाळेत अधोरेखित झाले

हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी नियोजित व अंमलात आणलेला होता. त्यांच्या उत्साहात, संयोजन कौशल्यात व शेतकऱ्यांशी संवाद साधण्याच्या क्षमतेतून भविष्यकाळातील सक्षम कृषी तज्ञांची झलक दिसून आली.

कार्यशाळेचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थांनी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कृषीदूतांनी आयोजित केलेली ही कार्यशाळा म्हणजे गावकऱ्यांच्या हितासाठी आधुनिक कृषी ज्ञान पोहोचवण्याचा एक यशस्वी प्रयत्न ठरला.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button