रत्नागिरी, दि. २३ (जिमाका) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
