रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबईच्या त्रैवार्षिक निवडणुकीत रत्नसिंधू पॅनल विजयी
मुंबई : रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई त्रैवार्षिक निवडणूकित रत्नसिंधू मराठा पॅनलची सत्ता आली आहे. आज झालेल्या निवडणुकीत रत्नसिंधू पॅनेलने बाजी मारली आहे.
रत्नसि॑धू मराठा पॅनलमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : श्री. सहदेव शिवराम सावंत, कार्याध्यक्ष. श्री. अशोक लक्ष्मण परब, उपकार्यध्यक्ष.श्री. गणपत होणाजी तावडे उपकार्यध्यक्ष.
कार्यकारिणी सदस्य याप्रमाणे :
श्री. सुबोध यशवंत बने.
श्री.सुहास तुकाराम बने.
श्री. विनोद दिनकर बने.
श्री. सुशिल जयवंत चव्हाण.
सौ. सुरक्षा शशांक घोसाळकर.
श्री. विजय गोविंद जाधव.
श्री. उमाकांत पंढरीनाथ कदम.
श्री. विजय गोविंद खामकर.
श्री. दीपक शंकर खानविलकर.
श्री. सचिन दत्ताराम खानविलकर.
श्री. जितेंद्र दत्ताराम पवार.
सौ. इंद्रायणी गणेश सावंत.
श्री. यशवंत गोपाळ साटम.
अशा सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. २०१९ मध्ये अखिल मराठा फेडरेशनने संस्थेचा उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श संस्था म्हणून गौरव केला आहे. संस्थेने ५ वर्षापूर्वी रत्नागिरी कोळंबे येथे जागा खरेदी केली आहे व तेथे लवकरच शैक्षणिक प्रकल्प सुरु होणार आहे.
संस्था व संस्थेने चालविलेल्या मराठी व इंग्रजी माध्यमाची शाळा प्रगतीपथावर ठेवण्यात विद्यमान कार्यकारी मंडळ कार्याध्यक्ष मा.श्री.मोतीराम विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली सभासदांच्या पाठींब्यावर यशस्वी झाले आहे.
विद्यमान कार्यकारी मंडळ काही जुने व नविन सहकारी,माजी विद्यार्थी, मराठा समाजातील कर्तबगार कार्यकर्ते व कर्तृत्ववान महिला घेवून रत्नसिंधू मराठा पॅनेल या नावाने त्रैवार्षिक निवडणूक लढवित होते.
१) रत्नागिरी शैक्षणिक प्रकल्प सुरु करणे,
२) सर्वोदय नगर इमारतीवर तीन मजले उभारणे,
३) ज्युनिअर कॉलेज सुरु करणे,
४) संस्था आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करणे,
५) मेघवाडी येथील इमारतीचे नूतनीकरण किंवा पूर्ण नवीन इमारत बांधणे हे उददिष्ट आहेत
या निवडणुकीसाठी मतदान बालविकास विद्या मंदिर, सर्वोदय नगर मुबई येथे झाले.