देवरुखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील भेटकार्ड स्पर्धेत चिन्मयी वणकुंद्रे प्रथम
देवरुख दि. २३ : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मार्गदर्शनपर व्याख्यान आणि भेट कार्ड बनविण्याच्या स्पर्धेचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेले या स्पर्धेत ६४ विद्यार्थ्यांनी आपली भेटकार्ड सादर केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा सन्मान चिन्मयी वणकुंद्रे हिने पटकावला. भेटकार्ड स्पर्धेचे परीक्षण प्रा. धनंजय दळवी आणि प्रा. स्वप्नाली झेपले यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांनी विद्यार्थ्यांना ‘भारतीय संस्कृतीमधील गुरूंचे स्थान’ या विषयावर मार्गदर्शन केले. भारतीय संस्कृतीमधील गुरुकुल परंपरा आणि गुरुकुल शिक्षण पद्धती, त्यामधील गुरूंचे स्थान व महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. भारतीय संस्कृती कृतज्ञतेवर आधारित आहे. कृतज्ञतेने माणूस मोठा होतो. कृतज्ञतेचा भाव लक्षात घेऊनच आपण विविध सण समारंभ साजरे करतो. यासाठीच गुरु प्रति आदर, सन्मान व सद्भाव व्यक्त करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा केल जात असल्याचे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले. प्रा. धनंजय दळवी यांनी *’जीवनातील कलेचे महत्व’* याविषयी मार्गदर्शन करताना जीवनातील कलेचे महत्त्व विशद केले. स्वतःला व्यक्त करण्यासाठी कोणतीही कला हे महत्त्वाचे माध्यम असून, यामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि निरीक्षण शक्ती वाढण्यास मदत होत असल्याचे नमूद करून याबाबतची उदाहरणे दिली. विविध कलांमधील करिअरच्या संधी याबाबत सविस्तर विवेचन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आई-वडील आणि गुरूंचे जीवनातील महत्व व त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रत्येकाची होणारी जडणघडण याबाबत आढावा घेतला. महाविद्यालयाला लाभलेला कलेचा वारसा आणि विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेले यश व नावलौकिक याबाबत सविस्तर भाष्य केले. यानंतर विद्यार्थ्यांनी बनविलेली भेट कार्ड देऊन आपल्या गुरूंबद्दल आदर व्यक्त केला. भेट कार्ड स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
प्रथम क्रमांक- चिन्मयी प्रशांत वणकुंद्रे- १२वी वाणिज्य, द्वितीय क्रमांक-(विभागून) रिया गणपत केदारी- ११वी संयुक्त-वाणिज्य, चैत्राली गणेश खामकर- १२वी वाणिज्य, तृतीय क्रमांक-(विभागून) मनस्वी विजय शेलार- ११वी वाणिज्य, चिराग अमर पवार- १२वी कला, हर्षाली प्रकाश दळवी- १२वी वाणिज्य, चतुर्थ क्रमांक-(विभागून) सृष्टी अनंत मानकर- ११वी वाणिज्य-ब, श्रुतिका रवींद्र इंगवले- १२वी कला, वेदिका राजेश पांगळे- १२वी वाणिज्य, सेजल चंद्रकांत वास्कर- १२वी कला, उत्तेजनार्थ, मनीष चंद्रकांत रेवाळे- ११वी संयुक्त-वाणिज्य, अपूर्वा उदय भोसले-११वी कला.स्पर्धा व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सीमा कोरे, प्रा. प्रवीण जोशी, प्रा. मयुरेश राणे आणि प्रा. अभिनय पातेरे यांनी मेहनत घेतली.