जिल्हा परिषदेत ५०८ पदांसाठी प्रशिक्षणाची संधी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
रत्नागिरी : शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक अहर्तप्रमाणे 12 वी पास 6 हजार, आयटीआय/पदवीका 8 हजार व पदवीधर/पदय्युत्तर 10 हजार शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे.
या योजनेंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या पुढील पदांसाठी प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. अनुक्रमे पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक प्रशिक्षणार्थी संख्या अशी आहे. – विस्तार अधिकारी (सां), विज्ञान/कृषी/वाणिज्य/अर्थशास्त्र किंवा गणित् विषयासह पदवीधर-1, वरिष्ठ सहाय्य्क (लिपीक) कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमएससीआयटी -2, वरिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमएससीआयटी -2, कनिष्ठ सहाय्यक कोणत्याही शाखेचा पदवीधर मराठी टंकलेखक-30, इंग्रजी टंकलेखन-40 एमएससीआयटी -12,
वाहनचालक 12 वी किंवा पदवीधर, जड वाहन चालविण्याचा परवाना-2, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदवीधर, लेखाशास्९, वाणिज्यशास्त्र, वाणिज्यशाखा, एमएससीआयटी -1, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 12 वी किंवा पदवीधर, मराठी टंकलेखन 30, एमएससीआयटी-1, ग्रामसेवक 12 वी परिक्षा 60 टक्क्यांनी उत्तीर्ण, कृषी पदवीका/पदवीधर, अभियांत्रिका पदविका, बीएसडब्लू, एमएससीआयटी -32, विस्तार अधिकारी (कृषी) कृषी विषयातील पदवीधर -1, पशुधन पर्यवेक्षक पशवैद्यीक शास्त्रातील पदवी/पदवीका, एमएससीआयटी -3, पर्यवेक्षका पदवीधर(समाजशास्९/गृहविद्यान) एमएसडब्लू -2, मिश्रक/औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण शास्त्रातील पदवी/पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार-3, आरोग्य सेवक (पुरुष) 12 वी/पदवी (10 विज्ञान विषयासह उत्तीर्ण)-10, आरोग्य सेविका (महिला) ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचारिया परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचारिया परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील -24.
कनिष्ठ अभियंता (बांधकाम) स्थापत्य अभियांत्रिकी या विषयासह पदवी/पदवीका-3, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी/पदवीका/पदव्युत्तर पदवी -1, प्राथमिक शिक्षक 12 वी उत्तीर्ण, डीएड व टीएटी परीक्षा उत्तीर्ण – 370, परिचर 12 वी पास -27, स्त्री परिचर 12 वी पास -3, सफाई कामगार -12 वी पास -3 पदे, चौकीदार -12 वी पास -1.
इच्छुक उमेदवारांनी https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे कार्यालय, औदयोगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, रत्नागिरी. संपर्कक्र. 02352-299385 यांचे कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधावा.