माचाळ पर्यटनस्थळी बीएसएनएल मोबाईलची रिंग वाजणार !
लांजा : लांजा तालुक्यातील समुद्रसपाटीपासून ४ हजार फुट उंचावर आणि दुर्गम असलेल्या माचाळ या पर्यटन ठिकाणी रिंग वाजणार आहे येत्या काही दिवसात माचाळ येथे 4 जी तंत्रज्ञानासह बीएसएनएल चा नवीन टॉवर उभारणीचे काम होणार आहे. लांजा तालुक्यात नवीन १० बीएसएनएल टॉवर मंजूर झाले आहेत. येत्या महिनाभरात 4G बीएसएनएल नेटवर्कचा लांजावासीयांना फायदा होणार होणार आहे.
लांजा येथील बीएसएनएलच्या अधिकारी श्रीमती आरती जोशी यांनी सांगितले की, लांजा तालुक्यात बीएसएनएल नेटवर्क लवकरच नवीन तंत्रज्ञानासह ग्राहकांना मिळेल. नेटवर्कच्या समस्या लवकरच सुटतील. लांजा तालुक्यात वीस टॉवर असून आणखी दहा नवीन टॉवरची भर पडत आहे. यामध्ये माचाळ, चींचुर्डी, पाळू, हर्डखळे, वणगुळे, बापेरे, गोविळ, वाडीलिंबू आदी ठिकाणीं नवे बीएसएनएल टॉवर होत आहेत.
माचाळ या ठिकाणी बीएसएनएल टॉवरसाठी सर्वे होऊन जागाही निश्चिती झाली आहे चिंचुरडी माचाळ या अतिदुर्गम भागात आता बीएसएनएल रेंज उपब्धत होणार आहे. नवीन टॉवर हे शासकीय जागेतच होणार आहेत. लांजा शहर गोंडेसखल हर्डखळे, सापुचेतळे, बापे रे आदी ठिकाणीं 4G मोबाईल सेवा लवकरच उपलब्ध होणार आहे.