प्रशांत यादव यांची भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती; ना. नितेश राणे यांच्याकडून शुभेच्छा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी प्रशांत यादव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे स्वागत करत राज्याचे मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून प्रशांत यादव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

ना. नितेश राणे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, ”प्रशांत यादव यांची ही नियुक्ती पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी तसेच रत्नागिरी ग्रामीण भागातील विकासासाठी टाकलेले एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक गतिमान, प्रभावी आणि तळागाळापर्यंत पोहोचेल, असा ठाम विश्वास आहे.” असेही राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

प्रशांत यादव यांच्या नियुक्तीनंतर रत्नागिरी दक्षिण विभागातील भाजप कार्यकर्त्यांमधेही उत्साह निर्माण झाला आहे. या नियुक्तीबद्दल जिल्ह्यातील विविध स्तरांतून प्रशांत यादव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment