पटवर्धन हायस्कूलमध्ये विद्यार्थी- शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळ संचलित पटवर्धन हायस्कूल प्रशालेत गुणवंत आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या विधी सेवा प्राधिकरणाचे वरिष्ठ न्यायाधिश सन्माननीय निखील गोसावी उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे उपस्थित होते.
भारत शिक्षण मंडळाच्या वतीने प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावी मधील शैक्षणिक कला क्रोडा साहित्य सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली
संस्थेच्या देणगीदारांच्या वतीनेही विविध विभागातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
या प्रसंगी भारत शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात येणारा गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्रीपाद गुरव यांना तर आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्रशालेच्या रमेश जगताप यांना देण्यात आला.
कॅप्टन दिलीप भाटकर पुरस्कृत युनायटेड उद्योग समूहाच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी प्रशालेचे शिक्षक कौस्तुभ पालकर यांना देण्यात आला
या प्रसंगी सन्माननीय न्यायमूर्ती निखिल गोसावी यांनी विद्यार्थ्यांना वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत अत्यंत उपयुक्त माहिती सांगत विविध अनुभव कथन केले.
या कार्यक्रमासाठी भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी , प्रशालेच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर , माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे , विनायक हातखंबकर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रदीप सुर्वे , सदस्य कीर , ॲडव्होकेट भाटकर , चंद्रकात घवाळी उपमुख्याध्यापक रुपेश पंगेरकर , पर्यवेक्षक अमर लवंदे , कल्पना शिरोळकर तसेच पालक प्रतिनिधी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रद्धा राजन बोडेकर यांनी केले.