चिपळूण-संगमेश्वरमधून महायुतीकडून शेखर निकम यांना उमेदवारी

Team RatnagiriLive
1 Min Read
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार शेखर निकम यांना केला ए.बी. फॉर्म बहाल

देवरूख (सुरेश सप्रे) : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार शेखर निकम यांना पक्षाचा ए. ब. फॉर्म राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर देत उमेदवारी जाहीर केली.

महायुतीत ज्या पक्षाचे विद्यमान आमदार त्या जागा त्याच पक्षाला सोडण्यात येणार हेच सुत्र अनेक ठिकाणी असल्याने चिपळूण – संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हे नक्की असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर करण्याआधीच मुंबई येथे झालेल्या बैठकी काही उमेदवारांना AB फॉर्म बहाल करण्यात आले. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार शेखर निकम यांची घोषणा करण्यात आली.

विधानसभेच्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेल्या शेखर निकम यांना पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment