रत्नागिरीच्या फाटक प्रशालेचे दोन विद्यार्थी रेखाकला परीक्षे राज्य गुणवत्ता यादीत

- फाटक हायस्कूलने परंपरा राखली
रत्नागिरी : महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल दि. १० जानेवारीला जाहीर झाला. या परीक्षेत फाटक हायस्कूलच्या २ विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले आहे.

शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून 37 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
27 विद्यार्थ्यांनी A श्रेणी, 8 विद्यार्थ्यांना B श्रेणी, 2 विद्यार्थ्यांना C श्रेणी प्राप्त झाली. अश्मी होडे ही राज्य गुणवत्ता यादीत 30 वी तर भूमिती विषयात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. तसेच प्रथम शिंदे याने राज्य गुणवत्ता यादीत 33 वा तर स्मरण चित्र विषयात राज्यात चौथा क्रमांक पटकावला.
A श्रेणी प्राप्त विद्यार्थ्यांची नावे : आर्यन कोतवडेकर , आदित्य बनगर , अद्वैत आग्रे ,अनिरुद्ध शेट्ये, अनुष्का जाधव , अश्मी होडे, इच्छा कदम, काव्या भुर्के ,क्षितिज जाधव, मैत्रेयी देसाई, मितेश लिंगायत, नवेली भिंगार्डे, नील मालुसरे, ओजस ब्रीद, पर्णिका परांजपे, पायल कीर, प्रथम शिंदे, ऋग्वेद शेंडे, सई कुळकर्णी, सलोनी पांचाळ , सार्थक पाटील, सार्थक पंडित, शशांक भोसले ,श्रीया गावडे , श्रेया पवार, स्वरा गवाणकर आणि वल्लभ दळवी यांनी यश मिळवले. बी ग्रेड प्राप्त विद्यार्थी – जान्हवी मराठे, पार्थ फणसेकर, राजरत्न पवार ,श्रावणी धामापूरकर, वरद भुवड, वेदांत मोडक, वेदिका शिवलकर , विश्व खेडेकर यांनी यश मिळवले. सी ग्रेड प्राप्त विद्यार्थी – सान्वी डाफळे , अथर्व लिंगायत यांनी यश मिळवले.
या सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक दिलीप भातडे व नीलेश पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या कार्याध्यक्षा ॲड. सुमिता भावे, कौन्सिलर शेखर शेट्ये, सीईओ दाक्षायणी बोपर्डीकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका शेट्ये मॅडम, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व कलाप्रेमींकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.