महाराष्ट्राची यूएई इंडिया बिझनेस कौन्सिलसोबत भागीदारी

रस अल खैमा : यु ए ई. मधील रस अल खैमा येथे झालेल्या UAE इंडिया बिझनेस कौन्सिलसोबत महाराष्ट्राने औद्योगिक भागीदारीसंदर्भात सामंजस्य करार केला आहे.
या संदर्भातील बैठकीस महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते. या सामंजस्य करावे बाबत त्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील उद्योगांचे जागतिकीकरण करण्याच्या दृष्टीने आम्ही UAE इंडिया बिझनेस कौन्सिलसोबत भागीदारी करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विस्तार आणि भरभराटीचे नवीन मार्ग उघडत आहोत. UAE इंडिया बिझनेस कौन्सिलने दोन्ही राष्ट्रांमधील आर्थिक सहकार्याला चालना देण्यासाठी, व्यवसायांना परस्पर संधी शोधण्यासाठी आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे असे यावेळी सांगितले.
या बैठकीस दुबई आणि उत्तर अमिरातीतील भारताचे कौन्सिल जनरल, सीईओ पी. वेलारासू, विकास आयुक्त ( उद्योग ) दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.