कोकण रेल्वे मार्गावर होळीसाठी विशेष गाड्या जाहीर

रत्नागिरी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेकडून प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची सोय करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
१) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – मडगाव – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी (01151/01152)01151 विशेष गाडी मुंबई CSMT येथून ६ व १३ मार्च २०२५ रोजी रात्री १२:२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.01152 विशेष गाडी मडगाव येथून ६ व १३ मार्च २०२५ रोजी दुपारी २:१५ वाजता सुटून पुढील दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव व, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नंदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवीम आणि कर्माळी.
२) लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी (01129/01130)01129 विशेष गाडी LTT येथून १३ व २० मार्च २०२५ रोजी रात्री १०:१५ वाजता सुटून पुढील दिवशी दुपारी १२:४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.01130 विशेष गाडी मडगाव येथून १४ व २१ मार्च २०२५ रोजी दुपारी १:४० वाजता सुटून पुढील दिवशी पहाटे ४:०५ वाजता LTT येथे पोहोचेल.
गाडीचे थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव व, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नंदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थीवीम आणि कर्माळी.
आरक्षण सुरू: गाडी क्र. 01152 आणि 01130 साठी २४ फेब्रुवारी २०२५ पासून सर्व PRS केंद्रे आणि IRCTC वेबसाइटवर तिकीट बुकिंग सुरू होईल.
होळीच्या सणासाठी प्रवास अधिक आनंददायक आणि सोयीस्कर करण्यासाठी विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे