स्वसंरक्षणासाठी तायक्वांदो उपयुक्त : संकेता संदेश सावंत

रत्नागिरी : मुलांमध्ये लहान वयापासूनच स्वसंरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे असून तायक्वांदो हा खेळ त्यासाठी अधिक उपयुक्त आहे असे संकेता संदेश सावंत यांनी सांगितले.
मुली आणि मुलगे या दोघांनाही स्वसंरक्षणाच कौशल्य आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. यासाठीच ओ नेस्ट गुरुकुल या शाळेत या मार्गदर्शनाच आयोजन केले होते. यावेळी उपस्थित पहिली ते तिसरीच्या मुलांना संकेता संदेश सावंत यांनी स्वसंरक्षण कसं करावं याबाबत प्राथमिक माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखवले. आणि तायक्वांदो या खेळाचा यासाठी कसा उपयोग होतो हे ही सांगितल.
या प्रात्यक्षिकांमध्ये मुलं उत्स्फूर्तपणे सहभागी झाली. या खेळा संदर्भात मुलांनी प्रश्न विचारून अधिक माहितीही घेतली.
संकेता संदेश सावंत या राष्ट्रीय पंच, 2 dan ब्लॅक बेल्ट असून गेली 17 वर्ष एक खेळाडू आणि आता पंच, प्रशिक्षक म्हणून या क्षेत्रात कार्यरत आहेत. अभ्युदयनगर बहुउद्देशीय सभागृह येथे त्यांचा तायक्वांदो प्रशिक्षण वर्ग आहे.
यावेळी ओ नेस्ट गुरुकुल या शाळेत झालेल्या या मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी शाळेमधील सर्व शिक्षकवृंद आणि मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले.