इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतलेला बाल जलतरणपटू रेयांश खामकरची पुन्हा चमकदार कामगिरी

Team RatnagiriLive
1 Min Read

लांजा :  सिंधुदुर्ग विजयदुर्ग येथे दि. २० एप्रिल २०२५ रोजी झालेल्या खुल्या गटातील ५०० मीटर सागरी जलतरण स्पर्धेत सात वर्षीय रेयांश खामकर याने  अतिशय रोमहर्षक रितीने प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक प्राप्त केले.

सात वर्षीय बाल जलतरणपटू रेयांश याने खुल्या गटात वयाने बऱ्याच मोठ्या असलेल्या जलतरणपटूंशी स्पर्धा करुन प्राप्त केलेल्या या सुवर्णपदकाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या बाल जलतरणपटू रेयांश खामकर याचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

रेयांशचे मूळ गाव लांजा तालुक्यातील आरगाव आहे. रेयांशचे आजोबा चंद्रकांत खामकर हे तालुक्यात सामजिक कार्यकर्ते म्हणुन परिचित आहेत

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment