ख्वाजा गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशनतर्फे बाजारपेठ परिसरात मोफत पिण्याच्या पाण्याची सोय

Team RatnagiriLive
1 Min Read


रत्नागिरी :  राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या झाडा बसत आहेत देखील दुपारी घराबाहेर पडणार आहे, रत्नागिरी बाजारपेठेतही उष्णतेमुळे बाजारपेठ खुप शांत असल्याचे दिसून येते. याचीच दखल घेउन ख्वाजा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनचे रत्नागिरीचे सदस्य फारूक जरिवाला, साजिद मेमन, अकील मेमन,ओवेस जरिवाला, रइस अत्तारी, इसाक मेमन, नवेद मुल्ला, जाफर अत्तारी, अल्ताफ कुरेशी यांच्या टीमने बाजारपेठ, धनजी नाका, कोंकण नगर येथे पिण्याच्या पाण्याची मोफत सोय केली आहे.

तापमान वाढल्याने स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवा त्यासाठी भरपूर पाणी प्या, या वेळेत बाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली ठेवा ताक लिंबू पाणी नारळ प्या उन्हाळा स्थळ आणि सुती कपडे घाला उन्हात कष्टाची कामे करणे क्षमताचा त्रास होतो. दूपारच्या वेळी बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ख्वाजा गरीब नवाज रिलीफ फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment