रत्नागिरीच्या नव्या एसटी बस स्थानकात चालक वाहकांसाठी वातानुकूलित कक्ष

Team RatnagiriLive
1 Min Read
  • वातानुकूलित हिरकणी कक्ष देखील सज्ज

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील सुसज्ज बस स्थानकाचे दिनांक 11 मे 2025 रोजी उद्घाटन होत आहे. या बस स्थानकामध्ये चालक वाहकांसाठी वातानुकूलित कक्षासह बाळ आणि त्यांच्या आईचा विचार करून वातानुकूलित हिरकणी कक्ष देखील करण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील बस स्थानकं आम्ही अत्याधुनिक केली आहेत त्यामुळं बस स्थानकांचं रत्नागिरी मॉडेल महाराष्ट्रात राबवले शकते.

डॉ. उदय सामंत,उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य.

रत्नागिरी येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बस स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत राजापूर लांजा चे आमदार किरण तथा भैया सामंत यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment