ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूज
रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीला वादळासह पावसाचा इशारा

रत्नागिरी : भारतीय हवामान विभागाकडून दिनांक 22 मे 2025 रोजीच्या अंदाजानुसार दि. 22 ते 26 मे दरम्यान जिल्ह्यात किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.
दि. 22 ते 26 मे दरम्यान 45-50 किमी प्रतितास ते 55 किमी प्रतितास या वेगाने वारे वाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. 23 मे रोजी रात्रीपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. 24 मे ते 26 मे दरम्यान अति खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना इशारा देण्यात येत आहे की त्यांनी समुद्रात जाऊ नये. आणि जे गेले आहेत त्यांनी किनाऱ्यावर 23 तारखेला परत यावे, असे सुचित करण्यात आले आहे.