ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
यंदाच्या दहीहंडी उत्सवासाठी दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण!

मुंबई : २०२५ च्या दहीहंडी उत्सवासाठी राज्यातील तब्बल दीड लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मागील दोन वर्षांत प्रत्येकी ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात आले होते, परंतु यावर्षी ही संख्या दुपटीने वाढवण्यात आली आहे.
दहीहंडीच्या पारंपरिक परंपरेला शासनाने दिलेला ‘साहसी खेळा’चा दर्जा महाराष्ट्रातील युवकांसाठी गौरवाची बाब आहे.
दत्तात्रय भरणे, क्रीडा मंत्री, महाराष्ट्र राज्य.
या योजनेसाठी सुमारे १.२५ कोटींचा निधी क्रीडा विकास निधीतून दिला जाणार असल्याचे क्रीडा मंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.