महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूजशिक्षण
मंडणगड न्यायालयाच्या इमारतीची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

रत्नागिरी : मंडणगड येथे रविवारी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर तसेच न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाची नव्याने उभी राहिलेल्या देखण्या इमारतीची राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी पाहणी केली व आढावा बैठक घेतली.
यावेळी उदय सामंत ह्यांनी १० सप्टेंबरपर्यंत ही इमारत पूर्णपणे हस्तांतरित करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या नूतन इमारतीचे लोकार्पण व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण हे दोन ऐतिहासिक कार्यक्रम मा. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहेत, असे यावेळी उदय सामंत ह्यांनी जाहीर केले.
या बैठकीकरिता जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांसह प्रशासकीय अधिकारी तसेच पत्रकार बांधव, ग्रामस्थ उपस्थित होते