चांदोरकर ग्रुपच्या सुमधूर आरत्या रत्नागिरी आकाशवाणीवर!

रत्नागिरी : कोकणातली गणपतीच्या आरत्यांची एक वेगळी परंपरा आहे. वाद्यांच्या साथसंगतीने होणाऱ्या चांदोरकर ग्रुपच्या या सुमधुर आरत्या यावर्षी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर प्रसारित झाला.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 27 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी हा सुमधुर आरत्यांचा प्रासंगिक कार्यक्रम झाला.
आरती स्पर्धेत गेली दोन वर्ष प्रथम क्रमांक मिळवलेला श्री देव सोमेश्वर देवस्थान चांदोर हा ग्रुप कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये मंदार महादेव चांदोरकर, महादेव जगन्नाथ चांदोरकर, अमेय विश्वास चांदोरकर, समीर प्रशांत चांदोरकर , संदीप सुहास चांदोरकर यांनी या आरत्या गायल्या.
या सुमधुर आरत्यांच संगीत आणि हार्मोनियमची साथ केली. पंडीत अवधूत अनंत बाम यांनी. तबलासाथ पुष्कराज महादेव चांदोरकर, पखवाजसाथ तन्मय गजानन चांदोरकर, झांज समीर प्रशांत चांदोरकर यांनी केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसारीत हा प्रासंगिक कार्यक्रम 1143khz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्ट्झ या एफ. एम. वाहिनीवर 27 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून 30 मिनिटांनी इंद्रधनुष्य अंतर्गत प्रसारीत करण्यात आला.