महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम यशस्वी

रत्नागिरी : शिवाजी हायस्कूल, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, जलजीविका संस्था पुणे, सागरी सीमा मंच, मिऱ्या, स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट रत्नागिरी या सर्व संस्थांनी संयुक्तपणे मिऱ्या बीच येथे आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्ताने साफसफाईचा आणि स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी केला.

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन चे प्राचार्य डॉ केतन चौधरी यांनी उपस्थित सर्वांना आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिन चे महत्व विषद करून स्वच्छतेची शपथ दिली . समुद्रकिनारा स्वच्छतेची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.


या समुद्रकिनाऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक घरातील टाकाऊ वस्तू आढळून आल्यात. गोळा केलेला सर्व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
यावेळी सागरी सीमा मंचाचे श्री स्वप्निल सावंत , संजीव लिमये, रंजन आगाशे, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ . आसीफ पागरकर, अभिरक्षक डॉ . हरीश धम्मगये, श्री नरेंद्र चौगुले, वर्षा सदावर्ते अर्चना सावंत, जाई साळवी, श्री रमेश सावर्डेकर, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राध्यापक निलेश मिराजकर, रोहित बुरटे, सुशील कांबळे, मयुरी डोंगरे आणि सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी हजर होते.

शिवाजी हायस्कूलच्या 57 विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जलजीविका संस्था पुणे या संस्थेचे चिन्मय दामले आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना हॅन्ड ग्लोज आणि पिण्याचे पाणी पुरविले तसेच कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या सर्व संस्थांनी एकत्रित येऊन सदर बीच वर्षभर स्वच्छ राहण्याकरता कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे ठरविले आहे. ग्रामस्थांनी सुद्धा तसेच मिरकर वाडा येथील सर्व मच्छीमारांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन समुद्रकिनारा स्वच्छ होण्याकरता तसेच स्वच्छ राहण्याकरता सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button