उरणचे समाजसेवक समीर म्हात्रे यांना ‘कोकण रत्न पदवी पुरस्कार’ जाहीर

Team RatnagiriLive
1 Min Read

उरण दि २८(विठ्ठल ममताबादे ) : गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक कार्यात हिरीरिने सहभाग असलेले, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार आणि उरण तालुक्यातील कळंबुसरे ग्रामपंचायतीचे सदस्य समीर शंकर म्हात्रे यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियाना तर्फे ‘कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर झाला आहे.

कोकणरत्न पदवी प्रदान सोहळा, शनिवार दि. १३ डिसेंबर, २०२५ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदाना जवळ, मुंबई येथे स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर यांची उपस्थिती लाभणार आहे.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment