महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची मतदान केंद्रांना भेट

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू झाली. मतदानाची तयारी आणि सुरक्षेची पाहणी करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी गोदूताई हायस्कूलमधील मतदान केंद्रासह महत्त्वाच्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी जिंदल यांनी मतदानाची व्यवस्था, नागरिकांची उपस्थिती तसेच प्रशासनाच्या नियोजनाची माहिती घेतली. त्यांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत व पारदर्शक रीतीने पार पडावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. मंगळवारी सकाळी सुरू झालेल्या मतदानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून सर्व केंद्रांवर वातावरण उत्साहाचे होते.





