रत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षण

राष्ट्रीय एकता पदयात्रेतून एकतेचा संदेश!

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांचा सहभाग

रत्नागिरी  : जिल्हा प्रशासन आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने एकता पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्याचा संदेश नागरिकांपर्यंत
पोहोचवण्याच्या उद्देशाने या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच समाजशास्त्र विभागाच्या स्वयंसेवक व विद्यार्थांनी यात सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

सरदार पटेल यांनी ५६० हून अधिक संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून भारताच्या एकतेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे हे पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट्य होते. विशेषतः तरुणांमध्ये राष्ट्रीय गौरव, देशभक्ती आणि देशाप्रती सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणे, एक भारत-श्रेष्ठ भारत या संकल्पनेला बळकटी देणे आणि विविधतेत एकता हे भारतीय वैशिष्ट्य अधोरेखित करणे हा या पदयात्रेचा एक महत्त्वाचा भाग होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'जनभागीदारीतून राष्ट्र निर्माण' (Nation – building through public participation) या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, सहभागींना विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत योगदान
देण्यासाठी प्रोत्साहित करणे हा उद्देश घेऊन ही पदयात्रा आयोजित केली गेली होती.
रत्नागिरीचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. भाऊ गलांडे आणि विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. राजेंद्र पाटील यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज
आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.  सदर पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल, मारुती मंदिर येथून सुरू होऊन जयस्तंभ मार्गे मारुती मंदिर आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल याठिकाणी समाप्त झाली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनातून आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे आणि प्रा. उमा जोशी यांच्या नियोजनातून महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी या पदयात्रेत यशस्वी सहभाग घेतला. रत्नागिरीतील अनेक महावियालये, शाळा व संस्था या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button