महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजशिक्षणसाहित्य-कला-संस्कृती
ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गास महाराष्ट्र शासनाची मान्यता
प्रवेशाची अंतिम मुदत 20 डिसेंबर 2025

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गास – सन 2026 महाराष्ट्र शासनाच्या वतीने मा. ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची मान्यता प्राप्त झाली असून प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशाची अंतिम मुदत 20 डिसेंबर 2025 असून किमान पात्रता एच. एस. सी (12 वी) उत्तीर्ण आहे. पदवीधर आणि सार्वजनिक ग्रंथालयांमार्फत येणाऱ्या उमेदवारांस प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परीक्षा होऊन उत्तीर्ण उमेदवाराला उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ग परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांस मान्यता प्राप्त प्रशाला (हायस्कूल) येथे ग्रंथपाल म्हणून तसेच सार्वजनिक ग्रंथालयातूनही ग्रंथपाल म्हणून नेमणूक होऊ शकते. महाविद्यालयामधूनही ग्रंथालय सहाय्यक म्हणून नेमणूक अशा सेवेच्या संधी उपलब्ध आहेत.
ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्ग 01 जानेवारी 2026 ते 31 मे, 2026 असा चालणार असून जून महिन्यात विद्यार्थ्यांना स्वतः शासकीय ग्रंथालयात तसेच अ वर्ग शासकीय ग्रंथालयातून प्रात्यक्षिके करायची असून कार्यानुभव आणि प्रकल्प सादर करावयाचा आहे. विद्यार्थ्यांना स्वतःची दैनंदिनी आणि संक्षिप्त अहवाल जून मध्ये होणाऱ्या कार्यानुभव आणि प्रात्यक्षिकाच्या कामाचा सादर करायचा आहे. ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 20 डिसेंबर 2025 अखेरपर्यंत खालील ठिकाणी किंवा संपर्कासाठी दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
पत्ता : रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ, रत्नागिरी
द्वारा – स्व. आम. सौ. कुसुमताईअभ्यंकर ग्रंथालय, रत्नागिरी.
1207, ‘सौमित्र’ नाचणे शाळा नं. 1* ( *जिल्हा परिषद) जवळ, सौभाग्य नगर, नाचणे, रत्नागिरी 415639
*संपर्क – 7972212944




