महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

चिपळुणात दोन डम्परच्या भीषण अपघातात महावितरण कर्मचारी ठार

मुंबई गोवा महामार्गावर कोंडमळा येथील घटना

चिपळूण : मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील कोंडमळा येथे रस्त्यातच उभ्या असलेल्या डम्परला दुसऱ्या एका डम्परने मागून जोराची धडक दिली. या अपघातात अमित एकनाथ हुमणे (30, रा. आगवे) यांचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.7) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला.

अमित हुमणे हे महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निधनाने आगवे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी शौकतअली या डम्पर चालकावर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश हुमणे हे त्यांच्या ताब्यातील डम्पर आगवे ते चिपळूण असे चालवित होते. यावेळी महामार्गावरील कोंडमळा येथे एका वळणावर शौकत अली याने डाव्या बाजूच्या लेनवर धोकादायक स्थितीत डम्पर उभा केला होता. या डम्परला मागून येणाऱ्या डम्परची जोरदार धडक बसली. यावेळी धडक देणाऱ्या डम्परमध्ये क्लिनर बाजूकडे बसलेले अमित हुमणे यांना गंभीर दुखापत झाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला तर सुरेश हुमणे हे जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.7) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडला.

अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अमित हुमणे हे महावितरणमध्ये कार्यरत होते. त्यांनी महावितरणच्या कबड्डी संघात चुणूक दाखवून एक राष्ट्रीय खेळाडू म्हणून सन्मान मिळविला होता. या शिवाय महावितरणच्या कबड्डी संघाचे कर्णधारपद भूषविले होते. त्यांच्या निधनामुळे महावितरण कर्मचाऱ्यांसह आगवेमध्ये शोक व्यक्त होत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button