महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
वीर वाजेकर महाविद्यालयामध्ये एड्स विषयी जनजागृती शिबिर

उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार दिनांक ०९-१२-२०२५ रोजी वीर वाजेकर महाविद्यालय मध्ये राष्ट्रीय सेवा योजना तसेच रेड रिबन क्लब आणि इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन व पंधरवडा निमित्त एड्स विषयी जन जागृती शिबिराचे आयोजन केले गेले.
ह्या कार्यक्रमाला समुपदेशक महादेव पवार, लॅब टेक्निशियन कु. तृप्ती परजणे, राष्ट्रीय सेवा योजने विभाग प्रमुख,शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र मधील महादेव पवार (समुपदेशक) यांनी विदयार्थ्यांना एचआयव्हीचा इतिहास, एचआयव्ही होण्याची कारणे, गैरसमज, लक्षणे, उपचार, एचआयव्ही होवु नये घ्यावयाची काळजी , एचआयव्ही एड्स चा टोल फ्री क्रमांक १०९७, एचआयव्ही एड्स कायदा २०१७ त्याचबरोबर प्रत्येकाने लग्नापूर्वी एचआयव्ही तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यकमाच्या शेवटी सर्व विदयार्थ्यांना आईसी वाटप करण्यात आले.




