कोकण रेल्वे मार्गावर ख्रिसमस, नवीन वर्ष स्वागतासाठी विशेष ट्रेन धावणार
खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवलीला थांबे
मुंबई: येत्या ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाच्या (New Year) सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने (Western Railway) ‘वडोदरा – कोट्टायम – वडोदरा’ (Vadodara – Kottayam – Vadodara) दरम्यान कोकण रेल्वे धावणारी साप्ताहिक विशेष ट्रेन (Weekly Special Train) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी एकूण 08 फेऱ्या करेल आणि महाराष्ट्र, गोवा, आणि केरळमधील (Kerala) महत्त्वाच्या स्थानकांना जोडेल.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
वडोदरा – कोट्टायम विशेष (Train No. 09124)
- प्रस्थान: वडोदरा येथून दर शनिवारी
- वेळ: 09:05 वाजता
- कोट्टायम आगमन: दुसऱ्या दिवशी (रविवार) 19:00 वाजता
- सेवा कालावधी: 20 डिसेंबर 2025 ते 10 जानेवारी 2026
कोट्टायम – वडोदरा विशेष (Train No. 09123)
- प्रस्थान: कोट्टायम येथून दर रविवारी
- वेळ: 21:00 वाजता
- वडोदरा आगमन: मंगळवारी 06:00 वाजता
- सेवा कालावधी: 21 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026
महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दिलासा: या स्थानकांवर असणार थांबा
ही विशेष ट्रेन दोन्ही दिशांना अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल. महाराष्ट्रातील (Maharashtra) प्रवाशांसाठी ही अत्यंत उपयुक्त असून, मुंबई उपनगरासह कोकणातील (Konkan railway) अनेक स्थानकांवर या गाडीला थांबा आहे.
- प्रमुख थांबे:
- गुजरात: सुरत, वापी.
- महाराष्ट्र: वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.
- गोवा: थिवीम, करमळी, मडगाव.
- कर्नाटक: कारवार, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकाम्बिका रोड बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, सुरथकल, मंगळूरु जंक्शन.
- केरळ: कासरगोड, कन्नूर, थलस्सेरी, कोझिकोड, तिरुर, शोरानूर, त्रिशूर, आलुवा आणि एर्नाकुलम टाऊन.
प्रवासासाठी उपलब्ध डबे
प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष ट्रेनमध्ये विविध श्रेणीचे डबे उपलब्ध असतील:
- प्रथम श्रेणी वातानुकूलित (First AC)
- वातानुकूलित 2-टियर (AC-2 Tier)
- वातानुकूलित 3-टियर (AC-3 Tier)
- शयनयान श्रेणी (Sleeper Class)
- जनरल द्वितीय श्रेणी (General Second Class)
आरक्षणासंबंधी माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला किंवा तिकीट खिडकीला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.




