महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराजकीयलोकल न्यूज
ना. योगेश कदम यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट
नागपूर : राज्याचे गृहराज्यमंत्री आणि खेड दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दापोली मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांची भेट घेतली.
दापोलीच्या विकास कामासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान दालनात झालेल्या या बैठकीत दापोली परिसरातील मत्स्यव्यवसायसंबंधित सुविधा, समस्या यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही युवा नेत्यांमध्ये चर्चा झाली.




