हरेश धाकल्या तांडेल यांचे निधन

उरण (विठ्ठल ममताबादे ) : उरण येथील सामाजिक कार्यकर्ते हरेश धाकल्या तांडेल यांचे शनिवार दि. ७/३/२०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, जावई, नातू , भाऊ असा त्याचा कुटुंब परिवार आहे. अत्यंत मनमिळावू,सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे प्रेमळ व्यक्तिमत्व असल्याने हरेश तांडेल यांच्या निधनामुळे तांडेल परिवार, मित्र परिवार, नातेवाईक व बालई ग्रामस्थांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
तांडेल परिवार व ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. कै.हरेश धाकल्या तांडेल यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ७:३० वाजता श्री क्षेत्र माणकेश्वर उरण येथे तर दिवस कार्य बुधवार दिनांक १८ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बालई येथील राहत्या घरी होणार आहे. कोणत्याही प्रकारचे दु:खवटे स्वीकारले जाणार नसल्याचे तांडेल कुटुंबीयांनी कळवले आहे.





