मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ साजरा

Team RatnagiriLive
1 Min Read

रत्नागिरी : मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे दिनांक २१ मे २०२६ रोजी “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” साजरा करण्यात आला.

दरवर्षी २१ मे हा दिवस भारतात “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” म्हणून पाळला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संपूर्ण देशात शांतता, अहिंसा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी तसेच युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतनकुमार जे. चौधरी यांनी दहशतवाद हा मानवतेसाठी घातक असून समाजातील सौहार्द आणि विकासासाठी गंभीर आव्हान आहे असे सांगितले तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शांतता, सहिष्णुता आणि राष्ट्रीय हिताच्या जाणीवा अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक उत्तरदायित्व आणि शांततेच्या मूल्यांविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment