राष्ट्रीय
मुघल गार्डन झाले अमृत उद्यान!
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या आवारातील मुघल गार्डनला आता नवी ओळख मिळाली आहे. मुघल गार्डन ऐवजी आता आहे ‘उद्यान अमृत’ उद्यान म्हणून ओळखले जाणार आहे.
केंद्र सरकारने या उद्यानाचे नामकरण अमृत उद्यान असे केले आहे. परकीय आक्रमणाच्या खाणाखुणा पुसून टाकण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. हे उद्यान सर्वसामान्यांसाठी ३१ जानेवारी ते २६ मार्च २०२३ पर्यंत पाहण्यासाठी खुले राहणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या जनतेने नामकरण सरकारने केले आहे.