रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त इंडियन कोस्ट गार्ड, रत्नागिरीने भाट्ये समुद्र किनारा स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन शिरगाव, सागरी सीमा मंच, रत्नागिरी, आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव यांच्या अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी झरी विनायक मंदिर, भाट्ये येथील किनारपट्टी परिसरात दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.१५ ते ९.१५ या वेळेत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी झाला.
समुद्र, किनारपट्टी आणि सागरी परिसंस्था यांचे संरक्षण करण्यासाठी स्वच्छ किनारपट्टी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. समुद्रकिनाऱ्यावर साचणारा प्लास्टिक कचरा, बाटल्या, पिशव्या तसेच इतर घनकचरा यामुळे सागरी जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. स्वच्छता राखणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि सागरी पर्यावरणाचे जतन करणे याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी किनाऱ्यावर विखुरलेला कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.
मत्स्य अभियंत्रिकी तंत्रनिकेतनाचे प्राचार्य आणि सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून “किनारपट्टी स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे” हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचा भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता अभियानात सहभाग
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment
Leave a Comment
