सचिन तेंडुलकरने घेतले गणपतीपुळेच्या श्री गणरायाचे दर्शन

Team RatnagiriLive
1 Min Read
  • मंदिर परिसरात चाहत्यांची सचिनला पाहण्यासाठी गर्दी

गणपतीपुळे : क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे (Ganpatipule) येथील मंदिरात हजेरी लावून श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. सचिन तेंडुलकरच्या या अचानक झालेल्या आगमनामुळे मंदिर परिसरात आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

​देवस्थानचे मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर यांनी सचिन तेंडुलकरचे देवस्थान समितीच्या वतीने जंगी स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी सचिनला गणपतीपुळे मंदिराचा इतिहास, महत्त्व आणि विविध धार्मिक पैलूंची माहिती दिली.

​दरम्यान, ‘लिटल मास्टर’ सचिन तेंडुलकर गणपतीपुळे येथे आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. लाडक्या खेळाडूला प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि त्याची एक झलक मिळवण्यासाठी मंदिर परिसर सचिनच्या जयघोषाने आणि उत्साहाने भरून गेला होता. दर्शन घेतल्यानंतर सचिन तेंडुलकरने उपस्थितांचे आभार मानले.

Loading

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment