रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगांव येथे दिनांक २६ ऑक्टोबर, २०२६ रोजी महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यात आली. महर्षि वाल्मिकी हे केवळ एक ऋषी नव्हते, तर ते एक महान रचनाकार होते. ते भारतातील सर्वात प्रभावशाली संस्कृत महाकाव्यांपैकी एक असलेल्या वाल्मीकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरुवातीच्या काळात ते वाटसरुंना लूटून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असत. परंतु नारद मुनीच्या भेटीनंतर व त्यांच्या उपदेशामुळे त्यांचे हदय परिवर्तन झाले. त्यानंतर त्यांनी कठोर तपश्चर्या केली ज्यामुळे त्यांना ‘महर्षि वाल्मिकी’ हे नाव मिळाले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. महाविद्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
![]()
