राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचे अमित जाधव संघ प्रशिक्षक
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/03/img-20230315-wa00072596011404950291089-640x470.jpg)
राज्यस्तरीय बालगट तायक्वांदो स्पर्धा उद्यापासून डेरवण येथे
रत्नागिरी : तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व रत्नागिरी तायकवाँडो स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा दि. 16 ते 18 मार्च दरम्यान स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यात डेरवण क्रीडा संकुल सावर्डे चिपळूण जिमनेस्टीक हॉल येथे होणार आहे.
![](http://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/03/img-20230315-wa00072596011404950291089.jpg)
या राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील अधिकृत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे ओम साईचे प्रशिक्षक ब्लॅक बेल्ट 2 दान अमित रेवतकुमार जाधव यांची जिल्हा संघाचे व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग असणार आहे.
या राज्य स्पर्धा करिता जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याने तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे सहसचिव तसेच तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे महासचिव मिलिंद पाठारे रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन कोषाध्यक्ष (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री. वेंकटेश्वरराव कररा जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक ) युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रांनिग सेंटर अध्यक्ष राम कररा यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.