राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी तालुक्याला तीन सुवर्ण पदकांसह डझनभर पदके!

Team RatnagiriLive
2 Min Read

युवा तायक्वांडो क्लबकडून तीन सुवर्ण, सहा रौप्य तर तीन कांस्य पदकांची कमाई

रत्नागिरी: 32 वी महाराष्ट्र राज्य बालगट तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा दि. 16 ते 18 मार्चदरम्यान स्पर्धा रत्नागिरी जिल्हा मधील डेरवन क्रीडा संकुल सावर्डे चिपळूण जिमनेस्टीक हॉल येथे सुरु आहे. या राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे ओम साई मित्र मंडळ येथील तायक्वांडो प्रशिक्षण वर्गातील खेळाडूंनी तीन सुवर्ण सहा रौप्य, तीन कस्या पदके पटकाविली आहेत.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व रत्नागिरी तायकवाँडो स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होत आहे.

या स्पर्धेत यश संपादन केले पदक प्राप्त खेळाडू पुढील प्रमाणे : संस्कृती सपकाळ, सुवर्ण, स्वरा साखळकर, सुवर्ण, मंथन आंबेकर. सुवर्ण, अस्मि साळुंखे. रौप्य, ओवी काळे, रौप्य, उपर्जना कररा, रौप्य, सार्थक गमरे, रौप्य, युसुफ मोगल रौप्य, स्वरा साखळकर. रौप्य, आस्मी साळुंखे, आराध्य तहसीलदार कास्य, ओवी काळे, कस्य.

या सर्व विजेते खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा व सह प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे (2दान ब्लॅक बेल्ट कोरिया) अमित जाधव (2दान ब्लॅक बेल्ट कोरिया) महिला प्रशिक्षक सौ.शाशिरेखा कररा प्रतीक पवार याचे मार्गदर्शन लाभले.


या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग असणार आहे. या राज्य स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडूंना युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर सर्व पदाधिकारी तसेच तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव श्री मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन सन्मानित पदाधिकारी (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री वेंकटेश्वरराव कररा जिल्हा महासचिव लक्ष्मण कररा (5th dan ब्लॅक बेल्ट ) जिल्हा कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी (शासनाचे क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार विजेते) युवा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष श्री राम कररा (शासनाचे युवा पुरस्कार विजेते) यांनी अभिनंदन करून विजेते खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This Article
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
Leave a Comment