महाराष्ट्र
कोकण एसटी प्रेमी ग्रुपतर्फे खेड आगाराच्या बसेसना नवीन मार्ग फलक भेट
खेड : कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे सदस्य श्री.नारायण यादव यांच्यातर्फे खेड आगार अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या
शिवतर -मुंबई व मुंबई -खेड या मार्गास नवीन मार्गफलक भेट स्वरूपात देण्यात आले.
सर्वसामान्य प्रवाशांचा आधार असलेली एसटी सुरळीत चालावी, लोकांमध्ये तिच्याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे काम चालते. प्रसंगी पदरमोड करून ग्रुपचे सदस्य अशा प्रकारचे उपक्रम राबवीत असतात. एसटी बसेसना मार्ग फलक भेट स्वरूपात देताना खेड आगाराचे चालक वाहक, ग्रुपचे सदस्य व इतर कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते.