महाराष्ट्र
भाजपा प्रदेश कार्यालय सचिवपदी मुकुंद कुलकर्णी
मुंबई, दि. ४ : भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या सचिवपदी श्री. मुकुंद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रदेश मुख्यालय सहप्रभारीपदी ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुमंत घैसास यांची तर प्रदेश कार्यालय सहसचिव म्हणून श्री. भरत राऊत, श्री.संजय फांजे आणि श्री.सदाशिव चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांच्या हस्ते या सर्वांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. श्री.कुलकर्णी हे २०१५ पासून प्रदेश कार्यालय सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.